Friday, June 6, 2008

च्युत्या उपद्व्याप!


"भेन्चोद."

आता मी काही पंजाबी वगैरे नाही किंवा हा शब्द (तसं शिवी) काही माझा ठेवणीतला देखील नाही. पण खरच .... काहीतरी हासडून द्यावं वाटतंय, हे जे फ़्रस्ट्रेशन जमा झालंय ते झटकून टाकावं वाटतय, म्हणून मग सगळी समाजशिलता बाजुला सारून एकच ... "भेन्चोद".

लहानाच मोठं होईपर्यंत मास्तर मायबापांनी एकच शिकवलं, आणि मग त्या पासनं कधी दुरावता आलंच नाही... "honesty is the policy" म्हणत नोकरीची ११ वर्ष संपली. इंजिनिअरींग संपवल्यापासून जो या नोकरीत लागलोय ते आजवर इथंचय. कधी नोकरी सोडावी वाटली नाही असं नाही किंवा कंपनीवर खूप प्रेम आहे असं नाही किंवा आपल्या बापाची कंपनी आहे असंही नाही. पण का कोण जाणे, आजपर्यंत नोकरी बदलावी असं कधी वाटलंच नाही. खरं सांगायचं झालं तर आजवर मी "नोकरी" करतोय असं वाटलच नाही. मला जे वाटलं तेच करत आलोय. "बॉस काय म्हणेल" किंवा "कुणाची तरी पर्मिशन लागेल" असं कधी वाटलंच नाही. मला पटलं .. मी केलं. इ.स. २००० मधे ३००-३५० लोकांच्या बुडाखाली आग लावून कंपनीनं त्यांना हाकललं. त्या २-३ महिन्याचा काळात ऑफ़िसात प्रत्येक जण कुणाची तरी मय्यत करून आल्यासारखाच दिसायचा. पण मी ... छ्या!! त्या जॉबकटचं टेन्शन आलेलं आठवत नाही. उलंट सर्वासोबत सकाळी चहा घेताना जी उडवायचो त्यातच मजा यायची. मला असं सहज पाहून एक मॅनेजर म्हणालेला, "तुला साला अशी मजाक सुचते तरी कशी. काही वाटत नाही का?" च्यायला म्हटलं, माझी नोकरी जाणार असेल तर मी थोबाड सुजवल्यानं काय होणारंय... जायची तर ती जाईलच. आणि गेलीच तर, "जा ना भेन्चोद ... who cares. मस्त ६ महीने घरी जाईन ... ऐष करीन आणि मग बघू पुढं काय करायच ते". तो मॅनेजर चाटच पडला. पण खरच आहे ... अगदी अशीच ११ वर्ष गेली इथं.

पण आज काल जे चाललंय ते पाहून वाटतं ... इज इट वर्थ? आपण जी इतकी गांड घासतो ... जी मर मर करतो .. ती कशासाठी? कुणाला तरी काही पडलंय का ... इथं साला आग लागलीय, कस्टमर रोज कोकलतो, रडतो, पडतो ... धमक्या देतो ... पण साला कुणाच्या बापाला काही फ़िकीर नाही. पण मग मलाच का अशी खुजली. मी का नाही ९-५ करत? मी का नाही टिंग्या मारत? मला का नाही जमत ते? की सगळे मित्र म्हणतात तसं मलाच किडा आहे? सकाळी ७ ते रात्री २-३ पर्यंत स्वत:ची जाळून घ्यायला मी काय हनुमान आहे? मला काय मिळतं यातनं ... मानसिक समाधान म्हणाल तर जे करतो त्यात सक्सेसच नसेल तर ते तरी कसं मिळणार .... पगार ... मोजकाच. उलट साला ज्यांनी काहीतरी करायला पाहीजे ते सुस्त. मग मला कुठला एवढा शौक!

किती वेळा विचार केला. पण उत्तर काही मिळत नाही. सगळं कळतं ... पण वळत मात्र काहीच नाही. म्हणतात ना ... रक्तात उतरलं की मग उतरून टाकण अवघड असतं. आणि मग थकलं की वाटत रहातं ... "is honesty really a good policy?". असं डिक्लेअर करून टाकावं म्हटलं तर मन तेही मानत नाही. आणि मग उगाच अधांतरी लटकल्यासारखं वाटतं .... विचार करून डोक्याचा किस होतो ... आणि तेवढ्यात फोन वाजतो. उचला महाराज ... उचला तो फोन ... आणि पाठवा आगीचा बंब.

साला ... आपणच चुत्या ... मग भोगा! शौक भारी ना .. मग विझवा आगी आणि घ्या जाळून बुडं!!!

3 comments:

Meghana Bhuskute said...

Hope it will be over soon.

Anonymous said...

Very good.. Keep it up.. Feel the same way many times.. You found a way to put it in words. Its as if you are writing my story.

Anonymous said...

Hmmm agree it's only words .. words are all we have to speak our heart away. B.O.L dinesh and remember "The darkest hour of the night is just before the dawn"
-Cheers