Monday, November 24, 2014

वावटळ

आसवांची नदी, विचारांच काहूर
बेसावध मनाला, वादळाची चाहूल ...

घोंघावणार्‍या वार्‍याचा वाढता जोर
थयथयून नाचणारा पिसाळलेला मोर ...

रेड्याच्या पाठिवर खुणावणारे यमदूत
मानगुटीवर नाचणारं, आठवणींचं भूत ...

रात्रीच्या अंधारात, चुकलेली वाट
तडफडती संध्या, रक्ताळलेली पहाट ...

पथरावलेले डोळे, निसटलेला जीव
थारोळ्यात पहूडलेलं अचेतन पार्थिव ...

शेवटच्या श्वासाची उद्विग्न घुटमळ
उध्वस्त झालेला गाव,
         .........    अन् शमलेली वावटळ ...

- कोण?

No comments: