अहो, ऐकून तरी घ्या आधी. मला कळतंय की फेसबुक आणि व्हाट्सअॅप च्या "मत"लबी - 'opinion'ous - जगात प्रत्येक जण मत मांडण्यासाठीच सज्ज आहे. "मला आधी माझं मत मांडू द्या, मग मी पटलं आणि जमलं तर तुमचही ऐकून घेतो" अशा "forward and advanced" जगात आणि रिलायंस जीओच्या फ्री-डेटा मुळं आणखीनच सोकाळलेल्या काळात मी माझी गोष्ट सुरु करण्याआधीच तुम्ही गोष्टीचा The End निकालात काढला असेल अन् माझ्या गोष्टीतला "भाई" सरणावर चढवलाही असेल. पण एक वेळ - जस्ट फाॅर चेंज म्हणून किंवा जस्ट फाॅर फन म्हणून किंवा निव्वळ माझी कीव येतेय म्हणून, पण माझी गोष्ट ऐकून तर घ्या.
थ्यँक्यू!
हं. तर "नावात काय असतं" असं आपण बर-याचदा ऐकतो. पण त्याच बरोबर "भाई" म्हटलं की अमकी तमकी व्यक्ती डोळ्यासमोर येतेच की नाही. तर अशा पुष्कळशा भाईपैकी निवडलेले तीन भाई.
"भाई क्रमांक एक हाजीर हो" आणि तद्नंतर "तमाम सबुतो और गवाहोंको देखने, सुनने और परखने के बाद यह अदालत भाईको मुजरीम करार देते हुए सजाये मौत सुनाती है. टु बी हँग्ड टिल डेथ..." असं ऐकायला मिळालं तर किती आनंद होईल असा विचार करायला लावणारा हा पहिला भाई. डोंगरी ते दुबई चा प्रवास विनातिकीट करून "स्वराज्य" उभारणारा हा भाई. "करावे परी किर्ती रूपे उरावे" या वचनाखातर जगणारा भाई. आपण मेल्याची वार्ता कळताच लोकांना आनंद व्हावा अशा उदार विचारांनी जगणारा आणि अशा सर्व कोत्या मनांच्या लोकांच्याच सुखासीठीच आयुष्यभर आडमार्गाने जनणारा भाई. "भाई" या शब्दाचा अर्थच बदलविण्या इतकी ऊंच ज्ञानपातळी असणारा भाई. एक व्यक्तीमत्व!!
दुसरा जरा चर्चेतला अन् कन्फूज करणारा. कधी फुल्टू Being Human तर कधी अवार्ड फंक्शन मधे हलक्याश्या विनोदाने Inhuman होणारा भाई. "भाई हाजीर हो" नंतर सगळ्याच गुन्ह्यातून सपशेल सुटणारा भाई. ज्ञानेश्वर माऊलींचा 'रेड्याला केवळ प्राथमीक वाचनाचे ज्ञान देऊन गीता वाचना'चा विश्ववीक्रम मोडीत काढत नविन अभ्यासक्रमानुसार P.T. वर भर देत चिंकारा प्राण्याला सेल्फ-डिफेंस खातर बंदूक चालवायला शिकवणारा "खुद्द माऊलींचा पहिला अवतार" म्हणवुन घेण्यीची पात्रता-प्राप्तीत भाई. Cameofloge सारखी कला अवगत असलेला आणि गाडी फुटपाथवर चढल्या क्षणी हीच कला वापरून ड्रायवरचा चेहरा समोर आणणारा भाई. सोबतच जाती धर्माचा विचार न करता गणपती साजरा करणारा अन् स्वत: मुसलमान असुनही मानलेल्या हिंदु बहिणीसाठी जीव ओवाळणारा भाई. ५२व्या वर्षी एकटा असुनही करोडोनी फॅन क्लब असणारा भाई. प्रत्येक सिनेमातून करोडो कमावणारा भाई.
आणि शेवटी तिसरा भाई जो आपणा सर्वांना ठाऊकंय. जोहान्सबर्ग मधे कुली वस्तीत रहाणा-या भारतीय कुटुंबाच्या हक्कासाठी लढणारा भाई. घाण आणि रोगराई मुळे वस्ती नेस्तनाबुत करण्याच्या आॅर्डर्स असताना विदाऊट फी वकिली करणारा भाई. दिवसाची रात्र करून सगळ्या भारतीयांना न्याय मिळऊन देणारा भाई. बॅरिस्टरी शिकुनही "साहेब" न होता "मित्र" होणारा भाई. या सा-या प्रयत्नापाई अब्दुल्ला शेठनी ज्याला भाई हे उपनाव दिले तो मोहनदास करमचंद गांधी "भाई".
तीन भाईंच्या या तीन त-हा.
आता बोला.
- कोण?
No comments:
Post a Comment